Saturday 20 March, 2010

मुलांचे प्रश्न आणि पालक


त्रिमिती बाराखडी दिल से या संस्थेच्या वतीने १९ व २० मार्च असे दोन दिवस स्वप्नांना देऊ नवी दिशाया विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोन दिवसांमध्ये परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले शनिवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे स्वप्नांना देऊ नवी दिशाया विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या हस्ते होणार झाले. त्यानंतर ६.३० ते रात्री ८ दरम्यान मुलांचे प्रश्न आणि पालकया विषयारील परिसंवादात सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, लेखिका डॉ. विजया वाड, अभिनेता आदेश बांदेकर, दिग्दर्शक अमोल गुप्ते सहभागी झाले होते. पालकाच्या भूमिकेत अभिनेता आदेश बांदेकर सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे यांनी केले

या परिसंवादात बोलताना अमोल गुप्ते म्हणाले की मुलांच्या भावविश्वात डोकावून बघीतलं तर असं लक्षात येतं की मुलांना त्यांच बालपण व्यक्त करायला आपण संधीच देत नाही. ती वेळ येई पर्यंत बालपण संपलेलं असतं. तर आदेश बांदेकर म्हाणाले की आपल्या पेक्षा आताच्या मुलांचं बालपण अधिक खडतर आहे. आपच्या आई-वडीलांनी आम्हाला खुप स्वातंत्र्य दिलं. मुलांना खेळू द्या, मजा करूद्या असं सांगून डॉ. हरिश शेट्टी म्हणाले की मुलांना मुलासारखं वागूद्या, जगूद्या. डॉ. विजया वाड म्हणाल्या की मुलांना खुप प्रेमाची आवश्यकता आहे. त्यांच्या अपयशातही पालकांनी सहभागी झालं पाहिजे.

या प्रसंगी बोलताना आमदार डॉ. दीपक सावंत म्हणाले की त्रिमितीला समाजात विधायक बदल घदवायचा आहे. असे कार्यक्रम हे त्याचच द्योतक आहे.

      

त्रैमासिक 'स्वप्नपंख'

त्रिमितीचा आणखी एक उपक्रम म्हणून तरूण मनाला दिशादर्शक असे विचार मांडणारा तसेच तरुणाई आणि त्रिमिती मध्ये एक कायमचा सेतू बांधणारा उपक्रम ‘स्वप्नपंख’ या अंकाच्या माध्यमातून आम्ही हाती घेत आहोत. सकारात्मक विचार देण्याची हे प्रक्रिया सातत्याने सुरू रहावी जेणेकरून आपल्या प्रयत्नांबरोबरच आमचीही साथ आपल्याला लाभत राहिल, विचारांचे आदान प्रदान होत राहिल आणि त्यातूनच एक समर्थ मराठी समाज उभा राहिल.
भवितव्याच्या भितीने गोंधळलेल्या मनाला एक जरी आशेचा किरण दिसला तरी त्या व्यक्तिच्या जीवनातला अंधार नाहिसा होतो आणि प्रकाशाकडे वाटचाल सुरू होते. प्रत्येक माणूस हा प्रतिभेचा हुंकार आहे, कलेचा स्त्रोत आहे आणि एकमेवाद्वितीय आहे. त्याने आपले स्वत्व ओळखले तरच तो आयुष्यात यशस्वी होवू शकतो. ‘स्वप्नपंख’ मध्ये दिलेल्या लेखांमधून सकारात्मक विचारांची आवर्तने आपल्यापर्यंत पोहोचतील. शिकताना, नोकरी-व्यवसाय करताना जगण्याची उर्मी न गमावता उत्कट आणि आनंददायी जगण्यासाठी या विचारांचा उपयोग झाला तर आमचा हा प्रयत्न सार्थकी लागला असे होईल.   


   नरेंद्र प्रभू
संपादक 'स्वप्नपंख'

स्वप्नपंख विषयी




सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या व्यक्ती आणि संस्थाना व्यासपीठ मिळवून देण्याचं बहूमोल कार्य आजपर्यंत त्रिमिती ही संस्था करत आली आहे. ‘त्यांच्या स्वप्नांचा प्रवास’ आणि ‘स्वप्न बघा स्वप्न जगा’ आणि ‘स्वप्नांना पंख प्रेरणेचे’ या जगण्याची नवी दिशा दाखवणारा प्रेरणादायी कार्यक्रमांच्या यशश्वी आयोजनानंतर त्रिमितीचा ‘स्वप्नपंख हा त्रैमासिक अंक रसिकांच्या हाती आला. पण सकारात्मक विचार सतत करत राहण्याची आवश्यकता लक्षात घेवून ‘स्वप्नपंख हे संकेतस्थळ माहितीजालात आले आहे. अनेक सकारात्मक गोष्टींची एकत्रीत गुंफण करण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. 


Tuesday 16 March, 2010

प्रेरणादायी कार्यक्रम





शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी आणि खऱ्याखुऱ्या नायकांचा जीवनप्रवास लोकांसमोर आणण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या त्रिमिती बाराखडी दिल से या संस्थेच्या सहकार्याने १९ व २० मार्च असे दोन दिवस ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन दिवसांमध्ये परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, लेखिका डॉ. विजया वाड, अभिनेता आदेश बांदेकर, दिग्दर्शक अमोल गुप्ते, संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर, राजीव तांबे, मिलिंद गुणाजी, डॉ. शिवारे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, त्यांना आयुष्यातील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळावी या हेतूने आयोजित हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

शनिवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ६.३० ते रात्री ८ दरम्यान ‘मुलांचे प्रश्न आणि पालक’ या विषयारील परिसंवादात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी आणि लेखिका डॉ. विजया वाड सहभागी होणार असून पालकाच्या भूमिकेत अभिनेता आदेश बांदेकर सहभागी होतील. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे करणार आहेत. रात्री ८ ते ९.४५ या वेळेत अभिमान गीत ही आनंदयात्रा या कार्यक्रमांतर्गत संगीतकार आणि गायक कौशल इनामदार यांच्याशी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर संवाद साधतील.

दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, २० मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृहातच स्वागत समारंभ होईल. त्यानंतर ६.३० वाजता ‘चाकोरीबोहरील करिअरच्या संधी आणि प्रगतीच्या नव्या वाटा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. राजीव तांबे आणि डॉ. शिवारे सहभागी होतील.  त्यानंतर रात्री ८ वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत अभिनेता मिलिंद गुणाजी घेणार आहेत. प्रवेशिका तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी उल्हास कोटकर - ९८२१०३३७३६ किंवा कौस्तुभ दहीभाते - ९३२२१३८५६३ अथवा विजय मुळीक यांच्याशी मो. क्र. ९८६९५३४४११ वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 





Monday 15 March, 2010

विचारांची गुढी


वाढती महागाई आणि सर्वार्थाने बदलणारं जग यात सामान्य मराठी माणूस भांबावून गेलेला दिसतोय. या समाजाला सामर्थपणे विकासाच्या दिशेने नेणारं नेतृत्व आजतरी राजकिय पटलावर दिसत नाही. सबळ आर्थिक शक्ती पाठीशी उभी असल्याशीवाय  केवळ अस्मिता तग धरू शकणार नाही. मुंबईबाहेर केव्हाच फेकला गेलेला मराठी माणूस रोजच्या लोकलच्या प्रवासातच आपलं अर्धंअधिक आयुष्य घालवत असल्याने गलितगात्र झालेला आहे. मराठी इतिहासाचं, थोर परंपरेचं कौतूक आहे पण त्यावर पोट भरता येत नाही अशी स्थिती आहे. यावर उपाय काय? काय करावं म्हणजे यातून सुटका होईल? निदान पुढची पिढी तरी वाचेल? विचारांची सुस्पष्ट  दिशा देणारा एक लेख आजच्या लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाला आहे. कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी मांडलेले हे विचार आपणाला नक्कीच प्रेरणा देतील. जरूर वाचा ..तरच उद्योजकतेत मराठी पाऊलं पडतील पुढे!

उद्या गुढीपाडवा, आजच उभारलेली ही विचारांची गुढी आपणा सर्वांना उध्याची गुढी उभारायला नवीन उत्साह देईल यात शंका नाही.   
      

Monday 8 March, 2010

स्वप्नांना देऊ नवी दिशा



Surfer's Dream


डॉक्टर दीपक सावंत (शिवसेना आमदार) व त्रिमिती बाराखडी दिल से आयोजित

स्वप्नांना देऊ नवी दिशा 

शुक्र १९ मार्च व २० मार्च २०१०, संध्या. ६.१५ वा.
स्थळ : दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले 



मुलांचे प्रश्न व पालक
सहभाग - अमोल गुप्ते, आदेश बांदेकर, डॉ. विजया वाड, डॉ. हरीश शेट्टी

अभिमानगीत हीं आनंदयात्रा
संगीतकार कौशल इनामदार एक खास संवाद
मुलाखतकार - मधुराणी गोखले प्रभुलकर 


चाकोरी बाहेरील करियरच्या संधी व प्रगतीच्या नव्या वाटा
सहभाग - डॉ. शिवारे, राजीव तांबे 



फोटोग्राफी ते राजकारण
श्री उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत
मुलाखतकार - मिलिंद गुणाजी 



प्रवेश विनामूल्य. 


प्रवेशिकांसाठी संपर्क ९८२१०३३७३६, ९३२२१३८५६३, ९८६९५३४४११



Thursday 4 March, 2010

यशवंत व्हा!




दहावीचं वर्ष हे तसं सीमोल्लंघनाचं वर्ष. सर्वार्थाने मुलं मोठी होतात., टेकऑफ घ्यायला जसं विमान धावपट्टीवर धावतं तसच हे असतं. आकाशात उंच भरारी घ्यायच्या आधी रवनेवरचं धावणं म्हणजे दहावीचं वर्ष. ते धावणं आता अखेरच्या ट्प्प्यावर आहे. आज दहावीचे विद्यार्थी परीक्षेला बसताहेत. एकूण १६,२६,३४२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. आज पर्यंत केलेल्या अभ्यासाचा कस लागेल, तेव्हा निशंक मनाने, भिती न बाळगता पण सजगपणे पेपर लिहा यश तुमचच आहे. तमाम विद्यार्थीवर्गाला 'स्वप्नपंखच्या' शुभेच्छा. यशवंत व्हा!


Related Posts with Thumbnails