Wednesday 9 November, 2011

मुलांना आपले जीवन कळावे यासाठी जॉब्स लिहित होते आठवणी



दसर्‍यादिवशीच सिमोलंघन करून अ‍ॅपलचा निर्माता स्टीव्ह जॉब्स अनंताच्या प्रवासाला निघून गेला. स्टीव्हचं कर्तूत्वच एवढं मोठं आहे की त्याला विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाही. कारण जगत असताना त्याने जी स्वप्न पाहिली ती सत्यात आणली. खरचं त्याने जग बदललं. गेले काही दिवस स्टीव्ह जॉब्स वर भरभरून लिहून आलं आहे. काही निवडक लिखाण स्वप्न पंख च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहे. भाग ५





आपल्या जीवनाविषयी मुलांना कळावे आणि आपण त्यांच्यासाठी का उपलब्ध होऊ शकलो नाही, हे कळावे याच उद्देशाने स्टीव्ह जॉब्स आपले चरित्र लिहिण्यास तयार झाले होते. त्यांचे आत्मचरित्र पुलित्झर पुरस्कार नामांकन मिळालेले वॉल्टर इस्कसन यांनी शब्दबद्ध केले आहे. जॉब्स यांच्या जीवनाच्या अखेरच्या आठवडय़ात त्यांनी इस्कसन यांची कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे भेट घेतली होती. त्यावेळी ते प्रचंड आजारी होते. त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. घरातील तळमजल्यावरच्या शयनकक्षामध्येचे ते राहत होते कारण त्यांना घराच्या पायऱ्या चढून जाण्याचीही ताकद नव्हती, असे इस्कसन यांनी सांगितले. टाइम डॉट कॉमवर लिहिलेल्या लेखात इस्कसन यांनी ही माहिती दिली आहे. पुस्तकासंबंधी आपण त्यांना भेटलो असता ते म्हणाले की, ‘माझ्या मुलांना मी समजण्याची आवश्यकता आहे. मी नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध नव्हतो, त्याचे कारण त्यांना समजावे आणि त्यांनी मला समजून घ्यावे, यासाठी मी पुस्तक लिहिण्यास तयार झालो आहे,’ असेही जॉब्स यांनी इस्कसन यांना सांगितले. त्यांची बुद्धी अखेरपर्यंत तल्लख होती आणि विनोदबुद्धी कायम होती. आपला मृत्यू जवळ आला आहे, हे त्यांना जाणवले होते आणि त्यांच्या आत्मचरित्राचा शेवटही तसाच आहे,’ असेही ते म्हणाले. हे आत्मचरित्र २१ नोव्हेंबरला प्रकाशित होणार होते, पण आता ते पुस्तक २४ ऑक्टोबर रोजी प्रकाशित होणार आहे.    
(लोकसत्ता मधून साभार)

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails