Wednesday 7 December, 2011

सर्वोत्तमतेचा चाहता




कधी न कधी हे जग सोडून आपल्याला जायचे आहे व सारं काही आपण इथेच सोडून जाणार आहोत त्यामुळे जे महत्त्वाचे आहे आणि आपले हृदय जे करायला सांगते त्याच गोष्टींचा मागोवा माणसाने घेत राहायला हवा.’’ अ‍ॅपेल कॉम्प्युटर्सचे प्रमुख संस्थापक व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे उद्योगकर्ते स्टिव्ह जॉब्स आपल्या चाहत्यांना हे स्पष्ट करतात. दर्जाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणतात ‘‘जगाला उत्तमोत्तम देण्याचा प्रयत्न करा. फार कमी लोकांना याची जाणीव असते की निसर्गाला सर्वोत्तम देणारी माणसं प्रिय असतात.

१९५५ साली अमेरिकेत जन्मलेल्या जॉब्स यांना लहान वयात मोठी स्वप्नं पाहण्याची सवय जडली होती. स्टिफन ोन्जियाक यांच्यासोबत संगणकाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी अर्धवट कॉलेज सोडले. कंपनी प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपल्याकडची व्होक्सव्ॉगन मिनी बस विकून टाकली. बऱ्याच वेळेस असे लक्षात येते की अनेक लोकांना काहीतरी आगळंवेगळं आणि मोठं काहीतरी साकारायचं असतं पण त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्यांना सारं काही रेडीमेडमिळावं ही प्रश्नमाणिक अपेक्षा असते. असे लोक काही दिवसांतच आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत आपलं स्वप्न का साकारलं गेलं नाही याची सुंदर कारणं जगाला देत बसतात.

संगणक तयार करण्याअगोदरच जॉब्स व त्यांचे सहकारी संगणक विकणाऱ्या माणसाला शोधू लागले. व्यवसायाच्या यशासाठी त्या व्यवसायाची विक्रीशाखा मजबूत असणे महत्त्वाचे! अन्यथा छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांची तक्रार असते की आमच्याकडे चांगली उत्पादने आहेत पण ती घेणारं कुणी नाही. जॉब्स सहजच प्रश्न करतात उरलेलं आयुष्य साखरेचे पाणी विकण्यात तुम्हाला घालवायचंच की जगाला चांगल्या हेतूने बदलण्याची तुम्हाला संधी पटकावायची आहे?’

माऊन्ट व्ह्य़ू येथील एक छोटेसे संगणकाचे दुकान प्रयोगाखातर त्यांचे पन्नास संगणक ठेवण्यास तयार झाले. तीस दिवसांच्या उधारीवर स्पेअरपार्टच्या एका दुकानातून पंचवीस हजार डॉलर्सचा माल घेऊन त्यांनी एका गॅरेजमध्ये शंभरएक संगणक असेंबल केले. त्यातील पन्नास त्या दुकानात पाठवून दिले. विश्वास आणि जिद्द यांची जर जोड असेल तर मनुष्याला आपले कोणतेच स्वप्न साकारणे अशक्य ठरत नाही. जॉब्स म्हणतात स्मशानभूमीतील सर्वात श्रीमंत माणूस हे नाव मिळवण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी आज आपण जगाला काहीतरी चांगलं दिलं हे सांगणारा माणूस मला व्हायला आवडेल.
पहिल्या वर्षी जेमतेम पावणे दोनशे संगणक विकले गेले. ते आपल्या संगणकांमध्ये नवनवे बदल करू लागले. अ‍ॅपल टू चे मॉडेल बाजारात येताच ते फार लोकप्रिय झाले. जॉब्स म्हणतात की अनेक कंपन्या वाजतगाजत आरंभ करतात व कालांतराने काटकसरीच्या मागे लागतात. जर लोकांना आपण उत्तमोत्तम दर्जाची उत्पादनं देत राहिलो तर ते नेहमी आपले पाकीट उघडून सज्ज असतात.

विमान दुर्घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्याला कंपनी सोडावी लागली व मतभेदांमुळे जॉब्स रिटायर झाले. अ‍ॅपलची स्थिती बिकट होत गेली. १९९७ साली जॉब्स परत कंपनीशी एकरूप झाले आणि कंपनी सावरली गेली. कोणताही व्यवसाय आपल्या मूळ निर्मात्याच्या इच्छाशक्तीवर व मानसिकतेवरच तरत असतो ही निसर्गाची मोठी शिकवण आहे. स्टीव्ह जॉब्स म्हणतात मी सी.ई.ओ. असल्यामुळे जे माझे विशेषज्ञ एखादी कल्पना अशक्य म्हणतात ती मला शक्य वाटते.जीवन यशाचा मंत्र ते स्पष्ट करतात. कोणतेही मोठे व श्रेष्ठ काम म्हणजे, आपण जे करतोय त्यावर प्रेम करणे. आपल्या आवडीच्या कामाचा मागोवा घेत राहा.

विलास मुणगेकर
(लोकसत्ता मधून साभार)

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails