गेल्या दिवाळीत त्रिमितीने ‘स्वप्न बघा, स्वप्न जगा’ अंतर्गत कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार
आणि प्रा.प्रविण दवणे यांच्या विचारांची आतषबाजी करून दिवाळी साजरी केली होती. या वर्षी दरर्याचं सिमोलंघन उमेदीचे शब्द घेऊनच करायचं असं ठरवलं आहे. या वर्षीचा कार्यक्रम रविवार १७ ऑक्टोबर रोजी दामोदर नाट्यगृह येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मधुकर तळवलकर, उदय निरगुडकर व गोपी कुकडे हे पाहुणे वक्ते म्हणून येणार आहेत. या दिग्गजांनी आपली स्वप्न कशी सत्यात आणली ते त्यांचाच तोंडून ऎकण्यातच खरी मजा आहे तेव्हा या कार्यक्रमाला जरूर या आणि विचारांचं सोनं लूटा...!
