Sunday, 30 January, 2011

मी आमदार होणार !लातूर गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या माया सोरटे या सद्ध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. महिला राजसत्ता आंदोलनाच्या त्या एक धडाडीच्या कार्यकर्त्या. त्यानी राजकारणात प्रवेश केला आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. ग्रामपंचयतीची निवडणूक असली तरी त्याना ती तेवढी सोपी नव्हती. ज्या पक्षात त्यानी प्रवेश केला त्याच पक्षाने त्यांची अडवणूक केली, पेच प्रसंग उभे केले, पण त्या सगळ्याला मायाताई पुरून उरल्या. पुरूषी अहंकाराचा सामना करत राजकारणात ताठ मानेने उभ्या राहिल्या. त्यांचं स्वप्न आहे ते आमदार व्हायचं.  मी आमदार होणार ही त्यांची जिद्द आहे. मायाताईंची धडाडी आणि संघर्ष पाहून खरच वाटतं त्या आमदार व्हाव्या. लोकसत्तच्या चतुरंग पुरवणीत मायाताईंवर आलेला हा लेख वाचा:

Sunday, 23 January, 2011

अजब भारूडमारवाडी समाजात जन्म.. शिक्षण फक्त सातवीपर्यंत आणि बाईची जात अशा सगळ्या गोष्टी प्रतिकूल असूनही जिद्दीने पुढे जात समाज प्रभोधनाचा वसा घेतला आणि एक अजब गोष्ट घडली. चंदाबाई तिवाडी यांना सांस्कृतिक क्षेत्रातील संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार नुकताच जाहीर झाला. पंढरपूर सारख्या ठिकाणी राहून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भारूडकार होणं ही काही सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्रातल्या  खेडय़ापाडय़ापासून ते मुंबई पुण्यासारख्या शहरात  चंदाबाई तिवाडीच्या भारुडाला आज प्रचंड मागणी आहे. चंदाबाईंचा जीवनपट उलगडून दाखवणारा हा विशेष लेख स्वप्नपंख च्या वाचकांसाठी लोकसत्ताच्या सौजन्याने.

Related Posts with Thumbnails