Showing posts with label त्रिमिती. Show all posts
Showing posts with label त्रिमिती. Show all posts

Sunday, 22 January 2012

स्वप्नपंख त्रैमासिक



त्रिमितीचा आणखी एक उपक्रम म्हणून तरूण मनाला दिशादर्शक असे विचार मांडणारा तसेच तरुणाई आणि त्रिमिती मध्ये एक कायमचा सेतू बांधणारा उपक्रम ‘स्वप्नपंख’ या अंकाच्या माध्यमातून आम्ही हाती घेत आहोत. सकारात्मक विचार देण्याची हे प्रक्रिया सातत्याने सुरू रहावी जेणेकरून आपल्या प्रयत्नांबरोबरच आमचीही साथ आपल्याला लाभत राहिल, विचारांचे आदान प्रदान होत राहिल आणि त्यातूनच एक समर्थ मराठी समाज उभा राहिल.


भवितव्याच्या भितीने गोंधळलेल्या मनाला एक जरी आशेचा किरण दिसला तरी त्या व्यक्तिच्या जीवनातला अंधार नाहिसा होतो आणि प्रकाशाकडे वाटचाल सुरू होते. प्रत्येक माणूस हा प्रतिभेचा हुंकार आहे, कलेचा स्त्रोत आहे आणि एकमेवाद्वितीय आहे. त्याने आपले स्वत्व ओळखले तरच तो आयुष्यात यशस्वी होवू शकतो. ‘स्वप्नपंख’ मध्ये दिलेल्या लेखांमधून सकारात्मक विचारांची आवर्तने आपल्यापर्यंत पोहोचतील. शिकताना, नोकरी-व्यवसाय करताना जगण्याची उर्मी न गमावता उत्कट आणि आनंददायी जगण्यासाठी या विचारांचा उपयोग झाला तर आमचा हा प्रयत्न सार्थकी लागला असे होईल. 

वार्षीक वर्गणीसाठी संपर्क : 09223222837 / 08652011176 / 09987003690

स्वप्नपंख त्रैमासिक

Tuesday, 12 October 2010

स्वप्न बघा, स्वप्न जगा


गेल्या दिवाळीत त्रिमितीने  ‘स्वप्न बघा, स्वप्न जगा’ अंतर्गत  कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार आणि  प्रा.प्रविण दवणे यांच्या विचारांची आतषबाजी करून दिवाळी साजरी केली होती. या वर्षी दरर्‍याचं सिमोलंघन उमेदीचे शब्द घेऊनच करायचं  असं ठरवलं आहे. या वर्षीचा कार्यक्रम रविवार १७ ऑक्टोबर रोजी दामोदर नाट्यगृह येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मधुकर तळवलकर, उदय निरगुडकर व गोपी कुकडे हे पाहुणे वक्ते म्हणून येणार आहेत. या दिग्गजांनी आपली स्वप्न कशी सत्यात आणली ते त्यांचाच तोंडून ऎकण्यातच खरी मजा आहे तेव्हा या कार्यक्रमाला जरूर या आणि विचारांचं सोनं लूटा...!

Saturday, 20 March 2010

मुलांचे प्रश्न आणि पालक


त्रिमिती बाराखडी दिल से या संस्थेच्या वतीने १९ व २० मार्च असे दोन दिवस ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोन दिवसांमध्ये परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले शनिवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या हस्ते होणार झाले. त्यानंतर ६.३० ते रात्री ८ दरम्यान ‘मुलांचे प्रश्न आणि पालक’ या विषयारील परिसंवादात सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, लेखिका डॉ. विजया वाड, अभिनेता आदेश बांदेकर, दिग्दर्शक अमोल गुप्ते सहभागी झाले होते. पालकाच्या भूमिकेत अभिनेता आदेश बांदेकर सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे यांनी केले

या परिसंवादात बोलताना अमोल गुप्ते म्हणाले की मुलांच्या भावविश्वात डोकावून बघीतलं तर असं लक्षात येतं की मुलांना त्यांच बालपण व्यक्त करायला आपण संधीच देत नाही. ती वेळ येई पर्यंत बालपण संपलेलं असतं. तर आदेश बांदेकर म्हाणाले की आपल्या पेक्षा आताच्या मुलांचं बालपण अधिक खडतर आहे. आपच्या आई-वडीलांनी आम्हाला खुप स्वातंत्र्य दिलं. मुलांना खेळू द्या, मजा करूद्या असं सांगून डॉ. हरिश शेट्टी म्हणाले की मुलांना मुलासारखं वागूद्या, जगूद्या. डॉ. विजया वाड म्हणाल्या की मुलांना खुप प्रेमाची आवश्यकता आहे. त्यांच्या अपयशातही पालकांनी सहभागी झालं पाहिजे.

या प्रसंगी बोलताना आमदार डॉ. दीपक सावंत म्हणाले की त्रिमितीला समाजात विधायक बदल घदवायचा आहे. असे कार्यक्रम हे त्याचच द्योतक आहे.

      

Tuesday, 16 March 2010

प्रेरणादायी कार्यक्रम





शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी आणि खऱ्याखुऱ्या नायकांचा जीवनप्रवास लोकांसमोर आणण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या त्रिमिती बाराखडी दिल से या संस्थेच्या सहकार्याने १९ व २० मार्च असे दोन दिवस ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन दिवसांमध्ये परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, लेखिका डॉ. विजया वाड, अभिनेता आदेश बांदेकर, दिग्दर्शक अमोल गुप्ते, संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर, राजीव तांबे, मिलिंद गुणाजी, डॉ. शिवारे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, त्यांना आयुष्यातील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळावी या हेतूने आयोजित हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

शनिवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ६.३० ते रात्री ८ दरम्यान ‘मुलांचे प्रश्न आणि पालक’ या विषयारील परिसंवादात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी आणि लेखिका डॉ. विजया वाड सहभागी होणार असून पालकाच्या भूमिकेत अभिनेता आदेश बांदेकर सहभागी होतील. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे करणार आहेत. रात्री ८ ते ९.४५ या वेळेत अभिमान गीत ही आनंदयात्रा या कार्यक्रमांतर्गत संगीतकार आणि गायक कौशल इनामदार यांच्याशी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर संवाद साधतील.

दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, २० मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृहातच स्वागत समारंभ होईल. त्यानंतर ६.३० वाजता ‘चाकोरीबोहरील करिअरच्या संधी आणि प्रगतीच्या नव्या वाटा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. राजीव तांबे आणि डॉ. शिवारे सहभागी होतील.  त्यानंतर रात्री ८ वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत अभिनेता मिलिंद गुणाजी घेणार आहेत. प्रवेशिका तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी उल्हास कोटकर - ९८२१०३३७३६ किंवा कौस्तुभ दहीभाते - ९३२२१३८५६३ अथवा विजय मुळीक यांच्याशी मो. क्र. ९८६९५३४४११ वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 





Monday, 8 March 2010

स्वप्नांना देऊ नवी दिशा



Surfer's Dream


डॉक्टर दीपक सावंत (शिवसेना आमदार) व त्रिमिती बाराखडी दिल से आयोजित

स्वप्नांना देऊ नवी दिशा 

शुक्र १९ मार्च व २० मार्च २०१०, संध्या. ६.१५ वा.
स्थळ : दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले 



मुलांचे प्रश्न व पालक
सहभाग - अमोल गुप्ते, आदेश बांदेकर, डॉ. विजया वाड, डॉ. हरीश शेट्टी

अभिमानगीत हीं आनंदयात्रा
संगीतकार कौशल इनामदार एक खास संवाद
मुलाखतकार - मधुराणी गोखले प्रभुलकर 


चाकोरी बाहेरील करियरच्या संधी व प्रगतीच्या नव्या वाटा
सहभाग - डॉ. शिवारे, राजीव तांबे 



फोटोग्राफी ते राजकारण
श्री उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत
मुलाखतकार - मिलिंद गुणाजी 



प्रवेश विनामूल्य. 


प्रवेशिकांसाठी संपर्क ९८२१०३३७३६, ९३२२१३८५६३, ९८६९५३४४११



Related Posts with Thumbnails