Showing posts with label बातमी. Show all posts
Showing posts with label बातमी. Show all posts

Friday, 2 March 2012

घराघरात विश्वकोश


मराठी विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी यांचं तो विश्वकोष हे एक स्वप्नच होतं, कोषाचे सोळा खंड त्यांच्या काळातच तयार झाले. पण ते जाडजूड खंड हाताळणं कठीण काम होतं (शिवाय किंमत हा मुद्दा होताच). आता ते सोळा आणि नंतर तयार झालेला सतरावा खंड इंटरनेटवर मोफत उपलब्ध होत आहे. त्या विषयी:
  

Marathi Vishwakosh'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासनाच्या वतीने, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) या विश्वकोश ग्रंथांचा  ६ सीडींचा (४५० ग्रॅम वजनाचा)  संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) या नोंदींची, १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेली) २०,१८२ पाने समाविष्ट आहेत. जी संगणकावर कधीही बघता येतात. यासाठी संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे.


घराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत त्या स्वरुपात महाराष्ट्र शासन जनतेला मोफत उपलब्ध करुन देत आहे. तेही युनिकोडमध्ये, सीडैकच्या सहकार्याने. विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जो १ ते १६ खंडांचा ज्ञानाचा खजिना तयार केला, तो आता ऐतिहासिक दस्तावेज आहे. तरी त्याचे महत्त्व कालातीत आहे आणि म्हणूनच इतिहासाच्या या सोनेरी खुणा आपण जतन करीत आहोत. भविष्यात पर्याप्त स्वरुपातील (अपडेटेड) विश्वकोशही याच माध्यमातून जगास स्वतंत्रपणे व मोफत अर्पिला जाईल. आज घराघरात इंटरनेट पोहोचले आहे. घराघरात संगणक आहेत. आपण त्यावर ज्ञानाचा खजिनाच उमलत्या पिढीस उपलब्ध करुन देत आहोत. त्यापैकी आजमितिस मराठी विश्वकोशाचा पहिला खंड युनिकोडमध्ये जसा आहे त्याच स्वरुपात तयार आहे. चित्रांसकट. जो शब्द हवा त्यावर क्‍लिक करा, सर्व माहिती उपलब्ध! 'तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मराठीचा प्रभावी प्रसार', हे विश्वकोशाचे ब्रीद आहे. यानंतर प्रतिमास १ खंड असे १५ महिन्यात (डिसेंबर, २०१२ पर्यंत) संपूर्ण १ ते १८ खंड सीडैकच्या सहकार्याने युनिकोड माध्यमातून विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जगास अर्पण करेल. अर्थात त्याने ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाहीच. पण केव्हाही, कुठेही हा ज्ञानमित्र उपलब्ध होतोय, हीच आनंदाची बाब. माननीय डॉ. जयंत नारळीकर, डॉ. स्‍नेहलता देशमुख, डॉ. अरुंधती खंडकर, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी या प्रकल्पास व्हिडिओ शुभेच्छा दिल्या आहेत. हा ऐतिहासिक दस्तावेज माननीय मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी जगास मोफत अर्पण झाला आहे. 'घराघरात विश्वकोश' या आमच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळाचा पत्ता www.marathivishwakosh.in  किंवा  www.marathivishvakosh.in  असा आहे.

Saturday, 20 March 2010

मुलांचे प्रश्न आणि पालक


त्रिमिती बाराखडी दिल से या संस्थेच्या वतीने १९ व २० मार्च असे दोन दिवस ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोन दिवसांमध्ये परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले शनिवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या हस्ते होणार झाले. त्यानंतर ६.३० ते रात्री ८ दरम्यान ‘मुलांचे प्रश्न आणि पालक’ या विषयारील परिसंवादात सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, लेखिका डॉ. विजया वाड, अभिनेता आदेश बांदेकर, दिग्दर्शक अमोल गुप्ते सहभागी झाले होते. पालकाच्या भूमिकेत अभिनेता आदेश बांदेकर सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे यांनी केले

या परिसंवादात बोलताना अमोल गुप्ते म्हणाले की मुलांच्या भावविश्वात डोकावून बघीतलं तर असं लक्षात येतं की मुलांना त्यांच बालपण व्यक्त करायला आपण संधीच देत नाही. ती वेळ येई पर्यंत बालपण संपलेलं असतं. तर आदेश बांदेकर म्हाणाले की आपल्या पेक्षा आताच्या मुलांचं बालपण अधिक खडतर आहे. आपच्या आई-वडीलांनी आम्हाला खुप स्वातंत्र्य दिलं. मुलांना खेळू द्या, मजा करूद्या असं सांगून डॉ. हरिश शेट्टी म्हणाले की मुलांना मुलासारखं वागूद्या, जगूद्या. डॉ. विजया वाड म्हणाल्या की मुलांना खुप प्रेमाची आवश्यकता आहे. त्यांच्या अपयशातही पालकांनी सहभागी झालं पाहिजे.

या प्रसंगी बोलताना आमदार डॉ. दीपक सावंत म्हणाले की त्रिमितीला समाजात विधायक बदल घदवायचा आहे. असे कार्यक्रम हे त्याचच द्योतक आहे.

      

Tuesday, 16 March 2010

प्रेरणादायी कार्यक्रम





शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी आणि खऱ्याखुऱ्या नायकांचा जीवनप्रवास लोकांसमोर आणण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या त्रिमिती बाराखडी दिल से या संस्थेच्या सहकार्याने १९ व २० मार्च असे दोन दिवस ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन दिवसांमध्ये परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, लेखिका डॉ. विजया वाड, अभिनेता आदेश बांदेकर, दिग्दर्शक अमोल गुप्ते, संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर, राजीव तांबे, मिलिंद गुणाजी, डॉ. शिवारे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, त्यांना आयुष्यातील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळावी या हेतूने आयोजित हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

शनिवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ६.३० ते रात्री ८ दरम्यान ‘मुलांचे प्रश्न आणि पालक’ या विषयारील परिसंवादात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी आणि लेखिका डॉ. विजया वाड सहभागी होणार असून पालकाच्या भूमिकेत अभिनेता आदेश बांदेकर सहभागी होतील. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे करणार आहेत. रात्री ८ ते ९.४५ या वेळेत अभिमान गीत ही आनंदयात्रा या कार्यक्रमांतर्गत संगीतकार आणि गायक कौशल इनामदार यांच्याशी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर संवाद साधतील.

दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, २० मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृहातच स्वागत समारंभ होईल. त्यानंतर ६.३० वाजता ‘चाकोरीबोहरील करिअरच्या संधी आणि प्रगतीच्या नव्या वाटा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. राजीव तांबे आणि डॉ. शिवारे सहभागी होतील.  त्यानंतर रात्री ८ वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत अभिनेता मिलिंद गुणाजी घेणार आहेत. प्रवेशिका तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी उल्हास कोटकर - ९८२१०३३७३६ किंवा कौस्तुभ दहीभाते - ९३२२१३८५६३ अथवा विजय मुळीक यांच्याशी मो. क्र. ९८६९५३४४११ वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 





Sunday, 21 February 2010

पुत्र नव्हे मित्र


मुलांवर पालकांनी आपली मतं लादली की त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात ! आपण कल्पनाही करू शकत नाही. चांगल्या मार्काने एम.एससी झालेल्या शमीमला केंद्रीय नागरी सेवेत जायचं होतं, पण कुटुंबीयांनी त्याच्यावर प्रोफेसर होण्यासाठी सक्ती केली आणी त्याच पर्यवसन कशात झालं ? वाचा लोकसत्तामधील मुळ बातमी. लखनौमध्ये पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या विमनस्क युवकास अटक



Related Posts with Thumbnails