दसर्यादिवशीच ‘सिमोलंघन’ करून ‘अॅपल’चा निर्माता स्टीव्ह
जॉब्स अनंताच्या प्रवासाला निघून गेला. स्टीव्हचं कर्तूत्वच एवढं मोठं आहे की
त्याला विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाही. कारण जगत असताना त्याने जी स्वप्न
पाहिली ती सत्यात आणली. खरचं त्याने जग बदललं. गेले काही दिवस स्टीव्ह जॉब्स वर
भरभरून लिहून आलं आहे. काही निवडक लिखाण ‘स्वप्न पंख’ च्या वाचकांसाठी
क्रमश: देत आहे. भाग 3...
प्रतिभावान
संशोधक
स्टिव्ह जॉब्सचं निधन ही संपूर्ण जगासाठी एक दुखद घटना आहे. या माणसानं आपल्या दूरदृष्टीनं संपूर्ण जगाला एकमेकांच्या संपर्कात ठेवण्यासाठी विविध उपकरणं बनवली. त्याच्या निधनाची बातमी त्याने निर्माण केलेल्या उपकरणावर झळकणं, यासारखी मोठी श्रद्धांजली नाही. स्टिव्ह हा धाडसीपणे वेगळा विचार करणारा, आपण जग बदलू शकतो असे मानणारा आणि ते करण्याची प्रतिभा असलेला थोर अमेरिकन संशोधक होता. आयुष्यातला प्रत्येक दिवस शेवटचा दिवस म्हणून जगण्याची स्टीव्हची सवय होती. मला वाटतं, त्याने केलेल्या प्रत्येक संशोधनात त्याला या सवयीचा उपयोग झाला असेल. त्याने जगाकडे बघण्याचा आपल्या प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलला.
- बराक ओबामा
तुल्यबळ स्पर्धक गमावला
स्टिव्ह आणि माझी पहिली भेट झाली त्याला तब्बल ३० वर्षे उलटून गेली आहेत. आम्ही दोघं एकमेकांचे सहकारी म्हणून वावरलो. त्याच्याबरोबर काम करणे खरोखरच आनंददायी होते. तसंच त्याचा स्पर्धक म्हणून काम करण्यातही तेवढाच आनंद मिळाला. आमच्यात निकोप स्पर्धा होती. आम्ही दोघं स्पर्धक असूनही आमच्या मैत्रीला या स्पर्धेचा उपसर्ग कधीच झाला नाही. स्टिव्हने आपल्या एकेका शोधाने जगावर एवढा दीर्घकालीन चांगला परिणाम केला आहे की, येणाऱ्या अनेक पिढय़ांना त्याचा विसर पडणं शक्यच नाही. पण त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेले आमच्यासारखे भाग्यवान लोक त्याला कधीच विसरणार नाहीत.
- बिल गेट्स (मायक्रोसॉफ्टचा जनक)
घडविता हात
स्टिव्ह, मला घडवल्याबद्दल आणि माझ्या आयुष्यात माझा खूप जवळचा मित्र बनून मला सतत मार्गदर्शन केल्याबद्दल तुझे आभार मानू तेवढे थोडे आहेत. आपण बनवलेल्या एकेका गोष्टीत जगात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता आहे, याची जाणीव करून दिल्याबद्दल खरंच तुझे आभार. तुझी उणीव मला नेहमीच भासत राहील.
- मार्क झकरबर्ग (सीईओ, फेसबूक)
स्टाइल आणि तंत्रज्ञानाची व्याख्या करणारा द्रष्टा
स्टिव्हने आपल्या आयुष्यात संपूर्ण जगाला भरभरून दिलं आहे. आपल्या कामातून त्याने स्टाइल आणि तंत्रज्ञानाची अशी नवीन व्याख्या केली आहे, जी पुढील काही पिढय़ा तरी बदलता येणार नाही. तो इतका हुशार, प्रतिभासंपन्न आणि द्रष्टा होता की त्याच्या सहवासातील लोकांना त्याच्यापासून अशक्य गोष्टीही शक्य करण्याची स्फूर्ती मिळत असे. संगणक क्षेत्रातील एक महान संशोधक म्हणून इतिहासात त्याचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल.
- एरिक श्मिड्ट (अध्यक्ष, गूगल)
महान माणूस
आपण काही विचार करण्याआधीच तुम्ही काय विचार करत आहात, हे स्टीव्ह मोजक्या शब्दात सांगे. तो खरंच खूप महान आहे. उपभोक्त्याला नेमकं काय हवंय, याचं त्याला असलेलं ज्ञान मला नेहमीच अचंबित करत आलं आहे. गूगलची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तर त्याने आपल्या तब्बेतीची काळजी न करता माझ्याकडे येऊन अनेकदा चर्चा केली होती. मला त्याचा बहुमोल सल्लाही दिला होता. त्याच्या निधनानंतर मी आणि गूगल परिवार स्टिव्हच्या आणि ‘अॅपल’ परिवारासह आहोत.
- लॅरी पेज (सीईओ, गूगल)
एक थोर विचारवंत
स्टिव्ह सध्याच्या युगातला एक महान विचारवंत, संशोधक आणि उद्योजक होता. त्याच्या विचारांचा, संशोधनाचा आणि उद्योगांचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. या युगातील तो सर्वात यशस्वी आणि थोर सीईओ होता. प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन यांच्या साधनांच्याबाबतीत लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी स्टिव्हने केलेलं कार्य हे खूपच मोठं आणि अतुलनीय आहे.
- रूपर्ट मर्डहॉक (अध्यक्ष, न्यूज कॉर्प)
संशोधकांचा शिक्षक
शिकण्याची इच्छा असणाऱ्या आणि संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना असणाऱ्या सगळ्यांसाठीच स्टिव्ह हा एक मोठा शिक्षक होता. त्याच्या निधनाचा दिवस म्हणजे संशोधन आणि त्यातील उच्च दर्जा यासाठी आग्रही असणाऱ्या सर्वासाठीच काळा दिन आहे.
- जेफ बेझोस (संस्थापक, अॅमेझॉन डॉट कॉम)
द्रष्टा उद्योजक
स्टिव्ह जॉब्स सध्याच्या युगातील एक द्रष्टा उद्योजक होता. त्याच्यासह काम करण्याची, त्याच्या उद्योगाचा भागीदार बनण्याची आणि त्याची मैत्री संपादन करण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचे भाग्य होते.
- रॅण्डल स्टेपहेन्सन (अध्यक्ष, एटी अँड टी)

(लोकसत्ता मधून साभार)
0 comments:
Post a Comment