वाढती महागाई आणि सर्वार्थाने बदलणारं जग यात सामान्य मराठी माणूस भांबावून गेलेला दिसतोय. या समाजाला सामर्थपणे विकासाच्या दिशेने नेणारं नेतृत्व आजतरी राजकिय पटलावर दिसत नाही. सबळ आर्थिक शक्ती पाठीशी उभी असल्याशीवाय केवळ अस्मिता तग धरू शकणार नाही. मुंबईबाहेर केव्हाच फेकला गेलेला मराठी माणूस रोजच्या लोकलच्या प्रवासातच आपलं अर्धंअधिक आयुष्य घालवत असल्याने गलितगात्र झालेला आहे. मराठी इतिहासाचं, थोर परंपरेचं कौतूक आहे पण त्यावर पोट भरता येत नाही अशी स्थिती आहे. यावर उपाय काय? काय करावं म्हणजे यातून सुटका होईल? निदान पुढची पिढी तरी वाचेल? विचारांची सुस्पष्ट दिशा देणारा एक लेख आजच्या लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाला आहे. कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी मांडलेले हे विचार आपणाला नक्कीच प्रेरणा देतील. जरूर वाचा ..तरच उद्योजकतेत मराठी पाऊलं पडतील पुढे!
उद्या गुढीपाडवा, आजच उभारलेली ही विचारांची गुढी आपणा सर्वांना उध्याची गुढी उभारायला नवीन उत्साह देईल यात शंका नाही.
0 comments:
Post a Comment