Saturday, 20 March 2010

त्रैमासिक 'स्वप्नपंख'

त्रिमितीचा आणखी एक उपक्रम म्हणून तरूण मनाला दिशादर्शक असे विचार मांडणारा तसेच तरुणाई आणि त्रिमिती मध्ये एक कायमचा सेतू बांधणारा उपक्रम ‘स्वप्नपंख’ या अंकाच्या माध्यमातून आम्ही हाती घेत आहोत. सकारात्मक विचार देण्याची हे प्रक्रिया सातत्याने सुरू रहावी जेणेकरून आपल्या प्रयत्नांबरोबरच आमचीही साथ आपल्याला लाभत राहिल, विचारांचे आदान प्रदान होत राहिल आणि त्यातूनच एक समर्थ मराठी समाज उभा राहिल.
भवितव्याच्या भितीने गोंधळलेल्या मनाला एक जरी आशेचा किरण दिसला तरी त्या व्यक्तिच्या जीवनातला अंधार नाहिसा होतो आणि प्रकाशाकडे वाटचाल सुरू होते. प्रत्येक माणूस हा प्रतिभेचा हुंकार आहे, कलेचा स्त्रोत आहे आणि एकमेवाद्वितीय आहे. त्याने आपले स्वत्व ओळखले तरच तो आयुष्यात यशस्वी होवू शकतो. ‘स्वप्नपंख’ मध्ये दिलेल्या लेखांमधून सकारात्मक विचारांची आवर्तने आपल्यापर्यंत पोहोचतील. शिकताना, नोकरी-व्यवसाय करताना जगण्याची उर्मी न गमावता उत्कट आणि आनंददायी जगण्यासाठी या विचारांचा उपयोग झाला तर आमचा हा प्रयत्न सार्थकी लागला असे होईल.   


   नरेंद्र प्रभू
संपादक 'स्वप्नपंख'

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails