Friday, 11 November, 2011

स्टीव्ह जॉब्स : १९५५ - २०११दसर्‍यादिवशीच सिमोलंघन करून अ‍ॅपलचा निर्माता स्टीव्ह जॉब्स अनंताच्या प्रवासाला निघून गेला. स्टीव्हचं कर्तूत्वच एवढं मोठं आहे की त्याला विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाही. कारण जगत असताना त्याने जी स्वप्न पाहिली ती सत्यात आणली. खरचं त्याने जग बदललं. गेले काही दिवस स्टीव्ह जॉब्स वर भरभरून लिहून आलं आहे. काही निवडक लिखाण स्वप्न पंख च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहे. भाग ६

आपल्याला लवकरच मृत्यू येणार आहे याची जाणीव म्हणजे  काहीतरी भव्य-दिव्य  करण्यासाठीचे साधन हाती लागल्याचा आनंद देणारी गोष्ट आहे. कारण  सर्व अपेक्षा,अभिमान, अपयशाने येणारे नैराश्य आणि वैषम्य या सर्व गोष्टी मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर  नगण्य  ठरतात आणि  सर्वात खरोखरच जे महत्वाचे आहे तेच शिल्लक राहाते. आता आपण मरणार आहोत  याची जाणीवच , आपण काही गमावणार आहोत  या विचारचक्राच्या सापळ्यातून  आपली सुटका  करते. आपला जीवनकाल मर्यादित असतो.  म्हणूनच  सतत इतरांचा विचार करून  दुसऱ्याचे जीवन जगण्यात  वेळ व्यर्थ घालवू नका. जुलूम, अत्याचाराचे बळी ठरू नका. सतत इतरांबद्दल विचार करीत राहिल्याने , इतरांच्या विचाराने वागत राहिल्याने  तुम्ही आपसूक त्याचे बळी ठरत असता.  तुमचा स्वत:चा  जो अांतरिक आवाज आहेतुमचा आंतरात्मा  जे सांगतो, ते इतरांच्या मतांच्या ओझ्याखाली दडपले  जाऊ देऊ नका.  तुमचे बहुतांश जीवन हे तुमच्या कार्याने भरलेले असावे. तुम्हाला जे चांगले आणि उदात्त वाटते, ते करणे यातच खरे समाधान आहे.  थोर कार्य करण्याचा एकमेव मार्ग  म्हणजे  तुम्ही जे काम करता  ते मनापासून आणि निष्ठापूर्वक करा. तुम्हाला अद्याप ते गवसले नसेल तर शोध सुरू ठेवा. एकदा तुम्हाला ते गवसले की कार्य कसे करायचे ते तुम्हाला आपोआप कळेल. जसजसा काळ जाईल, तसतसे ते अधिक चांगले आणि प्रभावी होत  जाईल.  म्हणूनच  ते सापडे पर्यंत शोध सुरूच ठेवा..!
(लोकसत्ता मधून साभार)0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails